By  
on  

किरण माने, अजय पूरकर यांच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीने 'मुलगी झाली हो'ला ठोकला रामराम?

स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो ही सर्वात लोकप्रिय मालिका. टीआरपीच्या रेसमध्येही ती अव्वल असते. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून विविध कारणांनी ही मालिका चर्चेत आहे. किरण मानेंना या मालिकेतून काढल्यानंतर या मालिकेबाबतचा वाद बराच चिघळला. यानंतर अलिकडेच मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे प्रसिध्द अभिनेते अजय पूरकर यांनीही ह्या मालिकेला रामराम ठोकल्याचे सोशल मिडीयावरुन त्यांनी सांगितले. आता यानंतर याच मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने मुलगी झाली हो मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. 

अभिनेते अजय पुरकर यांनी फेसबुक पोस्ट करत ही मालिका सोडत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता आंबिकर हिने ही मालिका सोडल्याचे समोर येत आहे. श्वेता ही या मालिकेत आर्याची भूमिका साकारत होती. ‘मराठी सिरियल्स’ नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजने याबाबतची बातमी दिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive