By  
on  

प्रसिध्द अभिनेत्री प्रिया बेर्डे हास्यजत्रेच्या मंचावर

संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आता हास्यपंचमी साजरी करते आहे. नुकतंच 25 एप्रिलपासून, आठवड्यातले पाचही दिवस हास्यजत्रा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हे असं असतांना महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या मंचावर साक्षात सुंदरी म्हणेजच ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे येणार आहेत. ९० च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नावारूपाला आलेल्या प्रिया बेर्डे सध्या 'धनंजय माने इथेच राहतात का?' ह्या नाटकाची निर्मिती करताय.

रंगमंचावर हे नाटक खूप गाजत असून याच नाटकाची संपूर्ण टीम हास्यजत्रेत हास्याचा धमाका करण्यासाठी येणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ह्या कार्यक्रमात प्रिया बेर्डे यांच्यासोबत त्यांची मुलगी स्वानंदी बेर्डे आणि मुलगा अभिनय बेर्डे सुद्धा हजेरी लावणार आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम आठवड्यातले ५ दिवस झाला आणि पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांना बेर्डे कुटुंबियांच्या रूपात गोड भेट मिळणार आहे. बेर्डे कुटुंब आणि नाटकाची पूर्ण टीम कार्यक्रमात कसा धुमाकूळ घालते आणि आपले हास्यवीर नवीन कोणते स्कीट करतात हे बघण्यासाठी पाहात राहा. 
 

पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'., सोम.- शुक्र., रात्री 9 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर!

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive