By  
on  

'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत पुन्हा अभिनेता अजय पुरकर यांची एंट्री!

   सोनी मराठी वाहिनीवरील ज्ञानेश्वर माउली या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. माउली आणि भावंडांचे चमत्कार, आणि आता सुरू असलेले श्रीसार्थ ज्ञानेश्वरीचे अध्याय प्रेक्षकांना आवडताय. मालिकेत माउलींच्या कार्याला विरोध करणारे विसोबा आता परतले आहेत. हे पात्र साकारणारे  अभिनेते अजय पूरकर हे पुन्हा एकदा मालिकेत दिसणार आहे.
    विद्वत्तेला माणूसकीची जोड आणि माणूस धर्माची कास नसेलल आळंदीतल एक मोठ प्रस्थ म्हणजे विसोबा खेचर. सारा गाव ज्यांच्या एक कटाक्षाने सुद्धा थरथर कापायचा असे हे आळंदीचे विसोबाशास्त्री. ज्ञानदेवांनी सामान्य लोकांपर्यंत जगणऱ्याच, गीतेचं ज्ञान पोहचवणऱ्याच त्यांच ध्येय पूर्णही केल. एककीकडे विश्वाच्या शांततेच मागण मागणऱ्या ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात मात्र आता पुन्हा विसोबा नावाचं एक महावादळ येतयं. एकीकडे अहंकार तर दुसरीकडे समर्पण… एकीकडे सत्ता तर दुसरीकडे स्वधर्म ! 
  अजय पुरकर यांचं काम प्रेक्षकांना आवडत होतं आणि आता मालिकेत ते पुन्हा येणार असल्याने नवीन काय बघायला मिळेल, याची उत्सुकता असणार आहे.
  विसोबा आणि त्यांचे किस्से बघण्यासाठी पाहात राहा, 'ज्ञानेश्वर माउली', सोम. शनि., संध्या 7 वा., सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive