‘मन उडू उडू झालं’ मालिकेतून हृता दुर्गुळेची एक्झिट?

By  
on  

ह्रता दुर्गुळे ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय नायिका. दुर्वा आणि फुलपाखरुनंतर ह्रताची मन उडू उडू ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि ्अल्पावधितच रसिकांची मनं जिंकली. इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. घराघरांत या मालिकेचे चाहते आहेत .पण नुकतीच ह्रताच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ह्रताने या मालिकेला रामराम ठोकल्याचं कळतंय. 

मन उडू उडू मालिकेत ह्रता ही दिपू या नायिकेच्या व्यक्तिरेखेत दिसते. पण आता नायिकाच या मालिकेला रामराम ठोकणार असल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ह्रता आपल्या प्रोजेक्टसमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. 

ई टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ‘मन उडू उडू झालं’ मालिकेच्या निर्मात्यांसोबत हृताचे भांडण झाले होते. या मालिकेच्या सेटवर स्वच्छता नसल्याने त्यांच्यात वाद झाल्याचे बोललं जात आहे. हा वाद सध्या विकोपाला गेला आहे. यामुळेच हृताने ही मालिका सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. हृताच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. हृताने या मालिकेत काम करण्यापूर्वी करार केला होता. त्या करारानुसार तिला एक महिन्याचा नोटीस पिरीयड पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतरच तिला ही मालिका सोडता येणार आहे.

परंतु ह्रताकडून किंवा तिच्या सोशल मिडीयावर याबाबतचं कुठलंच अधिकृत स्पष्टिकरण आलेलं नाही. 

दरम्यान, ह्रता ही प्रसिध्द दिग्दर्शक प्रतिक शहासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. डिसेंबर 2021 मध्ये या दोघांचा साखरपुडा मोठ्या थाटात-पार पडला होता. 

Recommended

Loading...
Share