'लेक माझी दुर्गा' मालिकेतील जयसिंग आणि गिटार– अतूट नाते !

By  
on  

  कलर्स मराठीवरील लेक माझी दुर्गा मालिकेतील जयसिंगची भूमिका साकारणार्‍या स्वप्नील पवारला लहानपणापासून संगिताची आवड आहे. अभिनयासोबतच तो गिटार देखील उत्तम वाजवतो. हे दोन्ही छंद त्याने एकदम मनापासून जोपासले आहेत. रियाजमध्ये खंड पडू नये म्हणून तो लेक माझी दुर्गा मालिकेच्या सेटवर देखील गिटार घेऊन जातो आणि त्याचा रियाज तिथे देखील सुरू असतो. कधी कधी सेटवर गाण्याची मैफल देखील जमते.

गिटार आणि स्वप्नीलचं अतूट नातं आहे हे यावरून सिध्द होते. सेटवर जयसिंग, दुर्गा म्हणजेच वरदा पाटील, हेमांगी कवी, सुशील इनामदार या सगळ्या कलाकारांची बरीच धम्माल मस्ती सुरू असते. बरेचसे कलाकार सेटवर स्वादिष्ट खाद्यपदार्थ देखील घेऊन येतात, याचसोबत यांचे रिल्सदेखील सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. 

जयसिंग म्हणजेच स्वप्नील संगीताच्या आवडीबद्दल बोलताना म्हणाला, “मी चौथीमध्ये असताना कुठल्याही प्रकारच्या संगीताचे माझे क्लासेस सुरू नसताना, शिक्षण न घेता मी छान गातो असे मला आजूबाजूच्यांनी सांगितले. मला असं वाटतं कुठेतरी या कौतुकामुळेच माझ्या संगीताच्या प्रवासाला सुरूवाट झाली. मी माझ्यावर खूप मेहनत घेऊ लागलो, कारण, मुळातच मला संगीत प्रिय आहे. कॉलेजमध्ये असताना मला असं जाणवलं की गिटार आणि गाणं हा कॉम्बो मला आवडतो आहे. आणि म्हणून मी गिटार शिकायचा निर्णय घेतला... कारण, मला एखाद वाद्य लहानपणापासून शिकायची इच्छा होती. सातार्‍यामध्ये विरेंद्र केंजळे आणि अरविंद मोटे यांच्याकडे मी गिटार शिकलो. आणि तिथून गिटार आणि माझा प्रवास सुरू झाला. मी स्वत:चे compositions देखील बनवले आहेत. जेव्हा मला एकटं वाटतं तेव्हा मी आवर्जून गिटार वाजवतो... मेरा साथी है वो !”

Recommended

Loading...
Share