By  
on  

योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेत स्वामी समर्थांचे दिव्य दर्शन

कलर्स मराठी वाहिनीवरील योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून सोशल मिडियावर याची विशेष चर्चा सुरू आहे,त्यातही स्वामी समर्थ मालिकेतल्या स्वामी समर्थांचे दर्शन या पहिल्या भागात घडल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

शंकर महाराज आणि स्वामी समर्थ यांचे अलौकिक,अद्भुत नाते भक्तांसाठी विशेष जिव्हाळ्याचा आपुलकीचा विषय आहे.हेच नाते योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेत उलगडणार आहे.

दैवी साक्षात्कार आणि चमत्कृतींनी उलगडणाऱ्या या भागांमधला हा बोध आगळावेगळा असणार आहे.

योगयोगेश्वर जय शंकर ही मालिका दररोज संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive