By  
on  

आई कुठे काय करते:अरुंधती-आशुतोष गातायत, भोवती तशीही मोरपीस खूण, पाहा video

आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. ह्या मालिकेतल्या सर्वच व्यक्तिरेखा प्रसिध्द आहे. मालिकेतल्या कथानकाबद्दल प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. आशुतोषच्या आयुष्यात येण्याने अरुधंतीच्या जगण्याला जशी नवी ओळख आणि दिशा मिळाली तसंच आशुतोषचं आयुष्यही अरंधतीमुळे उजळून निघालं. काही दिवसांपूर्वी अरुंधतीचं पहिलं गाणं सुखाचे चांदणे कमालीचं लोकप्रिय झालं. काही दिवसांपासून या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष एकत्र गाणं गाणार, असं चाललं होतं. शेवटी तो दिवस उजाडला.

अरुंधती आणि आशुतोषचं डुएट गाणं रेकाॅर्ड झालं आहे. अरुंधतीला आशुतोष साथ देत आहे. सोबतीस हलके, सावलीस ऊन, भोवती तशीही मोरपीस खूण... अशी गाण्याची सुरुवात आहे. स्टुडिओत या गाण्याचं रेकाॅर्डिंग होत असताना यश, गौरी तिथे आहेतच. पण अरुंधतीचं गाणं ऐकायला चक्क अनिरुद्ध आला आहे. अर्थात, ते अरुंधतीला अजिबात आवडलं नाही. त्याला पाहून ती तिचे क्षणभर सूर बेसूर होतात. मग निलेश मोहरीर तिला तशा सूचना करतो आणि गाणं पुढे चालू राहतं. सध्या हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. मंदार आपटे आणि विद्या करलगिकर यांचा या गाण्याला  आवाज आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive