By  
on  

हळद लागली हळद लागली! 'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये यश -नेहावर चढला हळदीचा रंग

छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमध्ये सध्या लग्नसराईची धामधूम आहे. पण त्यापैकी माझी तुझी रेशीमगाठच्या यश-नेहाच्या लग्नसोहळ्याकडे रसिकांचं विशेष लक्ष आहे. य़श आणि  नेहाचा नुकताच साखरपुडा झाला. त्यानंतर यशची धमाकेदार बॅचलर्स पार्टीसुध्दा पार पडली. मग मेहंदी सोहळ्यात समीर आणि यशने पोहचून नेहा-शेफा्लीला चकित तर केलंच शिवाय धुडगूसही घातला. 

आता यश आणि नेहाच्या हळदी सोहळ्याची धामधूम मालिकेत पाहायला मिळतेय. 

शानदार हळदी समारंभाला दोघांच्याही घरचे आणि मित्र-मैत्रिणींनी एकच कल्ला केला आहे. 

यश आणि नेहा हळदीच्या रंगात न्हाऊन निघाले आहेत. 

हळदीसाठी यश आणि नेहाचा खास लुक पाहायला  मिळतोय. 

यश-नेहाच्या हळदीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive