By  
on  

Video : यश आणि नेहाच्या संगीत सोहळ्यात समीर आणि शेफालीचा खास डान्स!

झी मराठी वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. मालिकेत सध्या यश आणि नेहाच्या लग्नाचा ट्रॅक सुरू असून त्यांच्या शाही लग्नाचा विशेष भाग रविवारी १२ जूनला प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

मालिकेतील यश आणि नेहा या जोडीसोबतच आणखी एक जोडी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे समीर आणि शेफालीची. त्यांच्यातील नोकझोक प्रेक्षकांना बघायला आवडते. त्यामुळे समीर आणि शेफाली यांनी देखील यश नेहाच्या लग्नासाठी कंबर कसली आहे.

यश आणि नेहाच्या संगीत समारंभात समीर आणि शेफाली हे पांडू सिनेमातील भुरूम भुरूम या लोकप्रिय आणि गाजलेल्या गाण्यावर डान्स करणार आहेत. या गाण्यात समीरचा खास दादा कोंडके स्टाईल अंदाज पाहायला मिळत आहे. गाण्याचा छोटा प्रोमो झी मराठीनं त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. समीर - शेफालीचा हा अनोखा अंदाज पाहून नेटकऱ्यांनी कमेन्स्ट करत त्यांचा डान्स पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. 

 

 

यश आणि नेहा यांच्या या शाही लग्न सोहळ्यामुळे मालिका विश्वात सध्या त्यांचीच चर्चा सुरू आहे. मालिकेतील लग्नाचं हे खास शुटींग सिल्वासा इथे करण्यात आलं आहे. तर सोशल मीडियावरील कलाकारांचे हटके लुक्स पाहून सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive