हा लोकप्रिय कार्यक्रम घेणार निरोप, छोट्यांसाठीचा हा कार्यक्रम घेणार त्याची जागा

By  
on  

छोट्या पडद्यावर कल्ला करणारा किचन कल्लाकार हा शो सध्या बराच चर्चेत असतो. तो यात सहभागी होणा-या सेलिब्रिटी पाहुण्यांमुळे. कलाकारांचं खाद्यप्रेम दाखवणारा 'किचन कल्लाकार' हा कार्यक्रम  झी मराठीवरून दर बुधवार आणि गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होतो. परंतु लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. किचन कल्लाकार या मालिकेत विविध कलाकारांबरोबर विविध क्षेत्रातींल दिग्गजांनी या व्यासपीठावर हजेरी लावत त्यांच्यातील पाककौशल्य दाखवले होते. तसंच आपल्या आयुष्यातील , कार्यक्षेत्रातील आठवणींना उजाळ दिला होता. तसंच अनेक गंमती-जमतीही या कार्यक्रमात घडवून आणल्या जातात. या कार्यक्रमाने अल्पावधितच लोकप्रियता मिळवली. 

खुमासदार सूत्रसंचालनाची धुरा अष्टपैलू कलाकार संकर्षण कऱ्हाडे यानं सक्षमपणं सांभाळली होती. तर प्रशांत दामले परीक्षकाच्या खुर्चीत बसून त्यांची जबाबदारी उत्तम पार पाडत होते. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत काही बदल सातत्यानं घडताना दिसत होतं. प्रशांत दामले यांच्याऐवजी निर्मिती सावंत परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. तर कधी संकर्षण नाटकाच्या दौऱ्यात व्यग्र असल्यामुळे त्याच्या जागी श्रेया बुगडे दिसत होती. अलिकेडच प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे त्यांच्या तू म्हणशील तसं आणि सारखं काही तरी होतंय या नाटकांचे प्रयोग लंडनला असल्यानं ते तिथं रवाना झाले आहेत. प्रशांत आणि संकर्षण यांच्या व्यग्र अशा शेड्युल्डमुळे कार्यक्रमावर परिणाम झाला आहे. आता या कार्यक्रमाच्या जागी नव्या कार्यक्रमाची वर्णी लागणार आहे. 

किचन कल्लाकार कार्यक्रमाच्या जागी नवा कार्यक्रम प्रसारित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर 'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर' कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

 

 

लहान मुलांच्या नृत्याला वाव देणारा डान्स महाराष्ट्र डान्स सुरु होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये  तो पाहण्याची उत्सुकता लागून राहिली  आहे. 

Recommended

Loading...
Share