'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील कीर्ती - शुभमचा हटके लूक!

By  
on  

स्टार प्रवाह वरील 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका असून मालिकेत लवकरच एक नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेत किर्ती आणि शुभमचा नवीन लुक प्रेक्षकांसमोर येणार असून त्यांचा हा अवतार पाहून प्रेक्षकही हैराण झाले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

फुलाला सुगंध मातीचा मालिकेत आपण पाहत आहोत की, तुषारच्या नव्या कामात त्याचा मित्र त्याला फसवतो आणि त्यानं केलेल्या वाईट कामाचं खापर तुषारवर फोडून तुषारला दोषी ठरलं जात. तुषारवर चोरीचा आळ आणून त्याला अटक करण्यात येते. कीर्ती स्वत: आयपीएस ऑफिसर असूनही तिच्या दिराला ती वाचवू शकत नाही. कारण कीर्तीकडे तुषार निर्दोष असल्याचे कोणेतीही ठोस पुरावे नाहीत.

मात्र तो निर्दोष असल्याची खात्री कीर्तीला आहे आणि यात तुषार चोर नसून विनीतच चोर असल्याचे पुरावे गोळा करण्यासाठी कीर्तीने शुभमच्या मदतीनं तुषार प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कीर्ती आणि शुभमनी हा वेष बदलला आहे. 

दरम्यान या लुकमध्ये कीर्ती आणि शुभम दोघेही हटके अंदाजात दिसत आहेत. व्हाइट टॉप, ब्लू जीन्स आणि त्यावर ब्राऊन जॅकेटमध्ये कीर्ती फुलऑन डॅशिंग अंदाजात दिसत आहे. तिच्या लांब सडक केसांचे झालेले कुरळे केस तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यांचा हा लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Recommended

Loading...
Share