'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत मनवा नाईकची एन्ट्री

By  
on  

सोनी मराठी वाहिनीवरील 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेला सध्या रंजक वळण मिळाले आहे. श्रद्धा आणि अभय मिरजकर यांची बेपत्ता झालेली  मुलगी सावनी सापडली आहे. आणि आता या मालिकेत डॉ. निलंजना या व्यक्तिरेखेची एन्ट्री होणार आहे. आणि ही व्यक्तिरेखा प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती मनवा नाईक साकारणार आहे.  सावनीला शोधण्यासाठी श्रद्धाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर श्रद्धाचा शोध संपला आणि सावनी सापडली. किल्वरकडे अनेक महिने कैदेत असणाऱ्या सावनीला ड्रग्सचे व्यसन लागले आहे. ड्रग्सच्या अतिवापरामुळे सावनीच्या मन आणि शरीरावर दुष्परिणाम झाले आहेत. आणि सावनीच्या आजारांवर उपचार करण्यासाठी डॉ. निलंजना येणार आहेत.

मनवा नाईक यांचा दर्जेदार अभिनय आणि वेगळी भूमिका प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. त्यामुळे  मधुरा वेलणकर, संजय मोने, हरीश धुदाडे यांसारखी तगडी कलाकार मंडळी मालिकेत असल्याने या मालिकेची रंगत आणखीनच वाढणार आहे.

सावनी व्यवस्थित बरी होईल का?, किल्वरचा खेळ खरंच संपला असेल का? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी पहात रहा 'तुमची मुलगी काय करते' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Recommended

Loading...
Share