रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे ठरल्या महामिनिस्टरच्या ११ लाखांच्या पैठणीच्या मानकरी!

By  
on  

झी मराठी वरील होम मिनिस्टरचं नवं पर्व 'महामिनिस्टर' या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. या पर्वात अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमातील मुख्य आकर्षण होतं, ते म्हणजे ११ लाखांची पैठणी.. या ११ लाखांच्या पैठणीची आधीपासूनच चर्चा होती आणि आता ११ लाखांची पैठणी पटकावलेल्या वहिनींची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांनी अंतिम सामन्यातील खेळ पूर्ण करत ११ लाखांची पैठणी जिंकण्याचा मान पटकावला आहे. रविवारी प्रसारित झालेल्या महाअंतिम सोहळ्यात ११ लाखांच्या पैठणीसाठी जबरदस्त सामना रंगला आणि या सामन्यात लक्ष्मी ढेकणे या महाविजेत्या ठरल्या. त्यामुळे लक्ष्मी ढेकणे यांच्या पदरात ११ लाखांची सोन्याची जर आणि हिरे जडवलेली पैठणी मिळण्याचा मान मिळाला आहे.

दरम्यान झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवरून विजेत्या लक्ष्मी ढेकणे यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात असून या पोस्टखाली प्रेक्षकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Recommended

Loading...
Share