'आई कुठे काय करते' मालिकेत आता दिसणार नाही अरुंधती? मालिका सोडल्याची चर्चा!

By  
on  

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेला सुरवातीपासूचं प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. प्रेक्षक पसंतीमुळे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत नेहमीचं अव्वल ठरते. मालिकेतील इतर पात्रांप्रमाणे अरुंधती हे पात्र प्रेक्षकांना खुपचं आवडते. पण सध्या मालिकेतील मुख्य अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर म्हणजेच अरुंधतीने मालिका सोडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.

मधुराणी प्रभुलकरनं काही वैयक्तीक कारणासाठी मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतला असल्यानं मालिकेत अनिरुद्ध आणि संजनावर फोकस केलं जाणार आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रसारित झाला असून या प्रोमोमध्ये अनिरुद्ध आणि संजना यांच्यासोबत घरातील इतर सदस्य दिसत आहेत. पण यांच्यात अरुंधती दिसत नाहीये. 

दरम्यान अरुंधती मालिकेत दिसत नाहीये त्यामुळे अरुंधतीने मालिका सोडली की काही दिवसांसाठी ब्रेक घेतलाय? असा संभ्रम चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे.

Recommended

Loading...
Share