By  
on  

अंकुश चौधरीच्या पत्नीचे छोट्या पडद्यावर कमबॅक ; दिसणार मुख्य भूमिकेत

मराठीतला स्टाईल आयकॉन म्हणून ओळख असणारा अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी. अंकुश चौधरी हा उत्तम अभिनेता असल्याचे सर्वांनाचं ठाऊक आहे, पण त्याची पत्नी देखील एक अभिनेत्री आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे. अभिनेत्री दीपा परब ही अंकुश चौधरीची पत्नी आहे. गेल्या काही वर्षांपासून ती सिनेसृष्टीपासून लांब असल्याचे पाहायला मिळालं. मात्र आता ती झी मराठी वरील एका मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

झी मराठी वर येणारी नवीन मालिका 'तू चाल पुढं' या मालिकेतून अभिनेत्री दीपा परब ही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी दिपाने बऱ्याच हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर तिने अनेक सिनेमांत सुद्धा अभिनय केला आहे. यानंतर दीपा आता 'तू चाल पुढं' या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तू चाल पुढं या मालिकेतून एका गृहिणीची गोष्ट सांगितली जाणार असून तिची स्वप्ने खुप मोठी आहेत, मात्र ती पूर्ण करताना तिला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागणार आहे. असं या प्रोमोतून दिसतंय. दरम्यान सोशल मीडियावर मालिकेच्या या प्रोमोखाली नेटकर्यांमध्ये अनेक चर्चा रंगल्या आहेत. तसेच दीपाचे चाहते तिला पुन्हा एकदा पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत. 

दरम्यान दिपा परबने अनेक जाहिराती आणि हिंदि मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘छोटी माँ’, ‘थोडी खुशी थोडी गम’, ‘रेत’ या हिंदी मालिकांमध्ये दीपाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. आता ‘तू चाल पुढं’ या नव्या मालिकेत दीपा परब मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत तिच्यासोबत धनश्री काडगावकर, वैष्णवी कल्याणकर, देवेंद्र दोडके, अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विशेष म्हणजे धनश्री काडगावर पुन्हा एकदा या मालिकेत खलनायकी भूमिका साकारताना दिसणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive