By  
on  

ठिपक्यांची रांगोळी' अतुल तोडणकरने सेटवरील फोटो शेयर करत म्हणाला

स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील तगडी स्टारकास्ट चाहत्यांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. दरम्यान मालिकेतील कुक्की गँग ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ठिपक्यांची रांगोळी ही मालिका आणि मालिकेतील कलाकारांमध्ये असलेलं बॉडिंग प्रत्येक भागात दिसून येत आहे. 

मालिकेतील कुक्की फेम अभिनेता अतुल तोडणकरने त्याच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. मालिकेत कुक्कीची भूमिका साकारणारा अभिनेता अतुल तोडणकरने नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात शशांक, माई, कुकी आणि इतर काही कलाकार दिसत आहे.

कुक्की फेम अतुल तोडणकरने ऑफस्क्रीन फोटो शेयर करत त्याखाली "शूटिंगमध्ये दुपारच्या जेवणानंतर वज्रसनात बसले पाहिजे. आमचे योगगुरू श्री.अमेय कानिटकर यांच्या सूचनेनुसार सगळे अर्थात प्राची, माई, शशांक आणि स्वतः अमेय हे वज्रसनात बसले आहेत. आणि दिग्दर्शकीय सूचनेनुसार कुक्की आणि दिग्दर्शक जेवणानंतर शवासनात बसले आहेत. योगा से ही होगा. कुक्की गँगचे आदरणीय मेंबर्स : अप्पू, सुमी आणि मानसी जेवणानंतर गायब”, असे अतुल तोडणकरने या पोस्टमध्ये म्हटले आहे. या फोटोमध्ये मालिकेतील सर्वजण छान हसताना दिसत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive