झी मराठी वरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे मन उडू उडू झालं. ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका असून या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षक विशेष प्रेम मिळताना दिसते. त्याचबरोबर मालिकेतील इंद्रा दिपूची लव्हस्टोरी देखील प्रेक्षकांना चांगलीचं भावली आहे. पण लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असून या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पार पडले. या मालिकेतील ऋतुराज फडके याने नुकतीच अभिनेत्री पूर्णिमा तळवळकर हिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
ऋतुराजने शेयर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलंय, "आमच्या सेटवरची सर्वात गोड मुलगी..होणार सून मी ह्या घरची ही मालिका आमच्या घरी रोज बघायचे, त्यात पौर्णिमा ताईने साकारलेली बेबी आत्या म्हणजे अप्रतिम होती, खूप राग यायचा, मी एक समज केला होता, खूप खडूस असणार ही बाई, (त्यात हीचे डोळे घारे,,) आधी मी एक मालिका करत होतो, तेव्हा पण ती एक दोन वेळा सेट वर येऊन गेली, पण कधी बोलण नव्हतं झालं, कारण सुद्धा हेच की मी घाबरायचं हिला."
पुढे त्याने लिहिलंय, "कालांतराने असा योग आला मन उडू उडू झाल या मालिकेत ती माझी आईची भूमिका करणारा होती, पहिल्या दिवशी जरा घाबरत बोलो, पण ह्या पोरीने पुढच्या दोन ते तीन तासात मला एकदम कम्फर्टेबल करून टाकला.. स्वतःहुन माझ्याशी बोलायला आली, आमच्याबरोबर फोटो काढायला आली…आणि आज आता असं झालं आहे, ती सेट वर किंव्हा मेकअप रूम मध्ये माझ्या आजूबाजूला ती हवी, सतत तिचा हसतमुख चेहरा दिसायला हवा, नाही दिसला तर कंटाळा यायला लागतो, आता अस झालं आहे की ती माझी खरीच आई वाटायला लागली, रोज आमच्या सगळ्यांसाठी घरातून डबा घेऊन येते, सतत हसतमुख असते, सेट वर कधीच कोणावर चिडलेल मी पाहिलं नाही, आणि आता सध्या ती reel करण्यात बिझी आहे"
दरम्यान अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर यांनी या मालिकेत इंद्रा आणि कार्तिकच्या आईची भूमिका साकारली आहे. ही मालिका संपल्यानंतर नुकतंच कार्तिकने पूर्णिमा यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्यांच्यासोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे. यात दोघांच्याही चेहऱ्यावर गोड स्माईल दिसत आहे.