देवमाणूस मालिका होणार बंद?, त्याजागी येणार 'ही' मालिका?

By  
on  

झी मराठी वरील देवमाणूस ही मालिका प्रचंड गाजली. त्यानंतर ही मालिका संपतेय तोच या मालिकेचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण या दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. सोशल मीडियावर या मालिकेला संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. पण ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.

गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर ही मालिका संपणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि या चर्चांना आता आणखी बळ मिळालं आहे. लवकरच एक नवीन मालिका झी मराठी दाखल होत असल्याचं कळतंय.

देवमाणूसच्याचं निर्मात्यांची आणखी एक नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आप्पी आमची कलेक्टर' असं या मालिकेचं नाव असून नुकताच या मालिकेचा मुहूर्त पार पडला होता. याचे फोटोही अनेक कलाकरांनी शेअर केले आहेत. अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Recommended

Loading...
Share