'डान्स महाराष्ट्र डान्स'च्या येत्या भागात दिसणार ही 'सोनाली'

By  
on  

नुकताच सुरू झालेला 'डान्स महाराष्ट्र डान्स' हा शो प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अवघ्या काही दिवसांतचं या शो मधील छोट्या डान्सर्सनी सर्वच चाहत्यांना त्यांच्या डान्सने वेड लावलं आहे. दरम्यान या शो मध्ये येत्या भागात बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिची एन्ट्री होणार आहे. 

सोनाली बेंद्रेने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला असून या फोटोखाली कॅप्शनमध्ये तिने असं म्हटलंय की, “मी हे लाईट्स खूप मिस केले, मी ही जागा खूप मिस केली, मी हा सेट खूप मिस केला. पुन्हा एकदा डान्स महाराष्ट्र डान्समध्ये परतल्यावर खूप छान वाटतंय… DID ची खूप आठवण आली. DID लवकरच सुरु व्हावं अशी आशा."

नुकताच 'डान्स महाराष्ट्र डान्स' या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेयर करण्यात आला असून या प्रोमोमध्ये सोनाली चेटकिणीसोबत पिंगा घालत आहे, धमाल करत आहे. त्याचबरोबर चेटकीण सोनालीला माहेरवाशीण असं संबोधून तिचं स्वागत करताना दिसत आहे. तसंच सोनाली डान्स परफॉर्मंसवर देखील दाद देताना दिसत आहे.

दरम्यान सोनाली बेंद्रे हा मराठी चेहरा बॉलिवूडमध्ये गाजताना दिसत आहे. कॅन्सरशी असलेली झुंज यशस्वीपणे पार पडल्यावर सोनालीने पुन्हा एकदा कमबॅक केल्याचं दिसत आहे. त्यामुळे सगळेच चाहते सोनालीला पुन्हा एकदा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Recommended

Loading...
Share