By  
on  

आई कुठे काय करते : अरुंधती मालिकेतून गायब, देशमुखांवर येणार मोठं संकंट?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते'. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतेय. तसंच टीआरपीच्या रेसमध्येसुध्दा ती अव्वल आहे, या मालिकेत सतत नवनवे ट्विस्ट येत असतात. यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिक प्रेक्षकांंच्या पसंती उतरतेय.

मालिकेची नायिका अरुंधती मालिकेतून सध्या गायब झाली आहे. पण अरुंधतीच्या समृध्दी बंगल्यातील माणसांवर संकट येऊन ठेपलं आहे.

'आई कुठे काय करते'मालिकेत अप्पांना मोठा आजार झाला आहे. अप्पाना सध्या काहीच लक्षात राहत नाही, काही आठवत नाही. पण घरचे सगळे सदस्य त्यांना हे जाणवू न देण्याचा प्रयत्न करतात. ते अप्पाना या आजाराची जाणीव करून देत नाहीत. पण आता अप्पांचा हा आजार त्यांच्याच जीवावर बेतणार आहे. मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार अप्पांच्या जीवावर मोठं संकट येणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

प्रोमोनुसार देशमुखांच्या घरी अजूनही दिवाळीचा उत्साह आहे. सगळे कुटुंबीय एकत्र बसलेले असतात तेवढ्यात अप्पांचे मित्र घरी येतात. ते 'अप्पा घरी आले का' असं विचारतात. कारण लगेच येतो म्हणून बाहेर पडलेले अप्पा अजून घरी आलेलेच नाही.  तेवढ्यात अप्पा गोंधळलेल्या अवस्थेत रस्त्यावर दिसतायत. आणि त्यांचा ऍक्सिडेंट होतो. पोलिसांना एक डेड बॉडी सापडते. त्या वर्णनानुसार ते अप्पाच असल्याचं  आशुतोष यशला सांगतो. ते ऐकून यशला जबर धक्का बसतो.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive