By  
on  

शुभारंभ मातीतल्या प्रेमकथेचा "शेतकरीच नवरा हवा" लवकरच!

 आज २१ व्या शतकात सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असताना देखील सामान्य माणूस असो वा गडगंज संपत्ती असलेला माणूस असो तो शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्यावर विसंबून आहे. शेतकरी हा शब्द ऐकताच आपला माणूस, जिव्हाळा, प्रेम आणि आदर अशा भावना आपल्या मनात येतात तर दुसरीकडे डोळ्यासमोर येतं ते त्यांच्या हालअपेष्टा, त्यांचे काबाड कष्ट, रात्रंदिवस त्याचे परिस्थितीशी झटणं. आपण बातम्यांमध्ये त्यांच्या  होणाऱ्या आत्महत्या बघतो आणि एक विचार येऊन जातो तोच मनाला चटका लावून जातो आज त्यांच्यामुळे आपण चार घास खाऊ शकतो त्यांची हि परिस्थिती आहे. पण, हे सगळं असताना जिथे मुलींना शेतकरी नवरा नको असतो, शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी पण मुलगी द्यायला तयार नाही तिथे एका उच्चभ्रू घराण्यातील शहरी, सुशिक्षित मुलगी, जेव्हा म्हणते मला “शेतकरीच नवरा हवा” तेव्हा काय होईल ? आज समाजामध्ये अश्या किती मुली आहेत ज्यांना शेतकरी मुलाशी लग्न करायचे आहे ? कसा असेल रेवा आणि सयाजीचा प्रवास ? कसं फुलेलं यांच्यातील प्रेम ? शुभारंभ होत आहे मातीतल्या प्रेमकथेचा... वास्तवाच्या जवळ घेऊन जाणारी आणि प्रत्येकाला पुन्हाएकदा विचार करण्यास भाग पडणारी मालिका… जिथे बघायला मिळणार आहे नाती आणि माती जपणाऱ्या शेतकऱ्याची हळुवार प्रेमकथा. रेवा आणि सयाजीच्या अनोख्या प्रेमाचा गंध संपूर्ण महाराष्ट्राभर दरवळणार. तेव्हा नक्की बघा स्वप्नील गांगुर्डे लिखित आणि वज्र प्रॉडक्शन निर्मित "शेतकरीच नवरा हवा" १४ नोव्हेंबरपासून सोम ते शनि संध्या ६.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. 

शेतीविषयी विशेष प्रेम असलेला सुशिक्षित, समजूतदार, देखणा असा सयाजी. सयाजीचे ध्येय लहानपणापासून ठरलेलं आहे, आजोबांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्याने सुरुवातीपासून आपले सर्वस्व शेतीसाठी पणाला लावले. Agriculture मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शेतीला पुन्हा सोन्याचे दिवस आणायचे हा त्याचा ठाम निर्धार आहे... तर दुसरीकडे आधुनिकतेचा वसा जपणारी, कॉर्पोरेट जगात वावरणारी रेवा जेव्हा सयाजीला भेटेल तेव्हा काय होईल ? कशी असेल यांची पहिली भेट ? ते म्हणतात ना  रेशीमबंधांच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात म्हणे. नशीब अशाप्रकारे गोष्टी जुळवून आणत कि व्यवसायाने architect रेवा सयाजीच्या गावी येते. आणि इथून सुरुवात होते मातीशी नातं जोडलेल्या सयाजी आणि रेवाच्या एका वेगळ्या प्रेमकथेला. हि प्रेमकथा कशी फुलेलं ? हे हळूहळू उलघडेल.

यानिमित्ताने बोलताना व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी, (वायकॉम18) - अनिकेत जोशी म्हणाले, कलर्स मराठीने याआधी देखील वास्तवादी मालिका बनवल्या. पण "शेतकरीच नवरा हवा" हि मालिका बनवण्या मागे अनेक कारणे आहेत. ही मालिका अतिशय नाजूक विषयावर आधारलेली असून या मालिकेद्वारे अनेक महत्वाच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. समाज प्रबोधना सोबतच आजच्या काळात शेती आणि शेतकरी ह्यांचं सर्वात जास्त महत्व जाणवलं ते कोरोनामध्ये. जिथे नोकऱ्या गेल्या, सर्व व्यवसाय बंद झाले, फक्त शेती, दुग्ध व्यवसाय हाच खरा शाश्वत व्यवसाय आहे जो कधीही मंदीत येणार नाही याची जाणीव आपल्याला झाली. तेव्हा शेती आणि त्याचसोबत आपला शेतकरी यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा हे त्यातील एक महत्वाचे कारण. सामाजिक बाजू मांडताना मालिकेत सयाजी आणि रेवा यांची प्रेमकथा उत्तम प्रकारे गुंफली गेली आहे. 
पुढे ते  म्हणाले, याचसोबत ग्रामीण महाराष्ट्राच्या पाश्वर्भूमीवर आधारित या मालिकेची मांडणी आणि चित्रीकरणामुळे प्रेक्षकांना हि नक्कीच आपलीशी वाटेल. आपला प्रेक्षक सुजाण आहे त्यामुळे त्याला नक्कीच परिस्थितीचे गांभीर्य कळेल आणि तो या गोष्टींवर विचार करेल. कलर्स मराठीवर पहिल्यांदाच ६.३० वा. दैनंदिन मालिका घेऊन येत आहोत याद्वारे प्राईम बँड वाढवण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी “शेतकरीच नवरा हवा” या विषय उत्तम आहे”.  

मालिकेनिमित्त बोलताना प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी, (वायकॉम18) - विराज राजे म्हणाले, मनोरंजन माध्यम हे समाजाचा आरसा असतं असं म्हंटल तर चूक ठरणार नाही. म्हणूनच कलर्स मराठीने सुंदरा मनामध्ये भरली, भाग्य दिले तू मला, सुखाच्या सरींनी हे मन बावरे अशा आणि अनेक सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. आपण जेव्हा सामाजिक बाबीचा किंवा प्रश्नांचा विचार करतो तेव्हा अगणिक मुद्दे आपल्या मनामध्ये डोकावून जातात आणि त्यातलाच अतिशय महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे शेतकरी मुलाला मुलगी मिळणं अत्यंत कठीण आहे हि वस्तुस्थिती आहे. जेव्हा या विषयावर चर्चा झाल्या तेव्हा सामाजिक प्रश्नाची जाणीव आम्हांला झाली. असं वाटलं कि या विषयाला मांडणं खूप महत्वाचं आहे. आणि आपल्या दैनंदिन मालिकेतून हे जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकतं या विचारधारणेतून या मालिकेची निर्मिती करण्यात आली”.  

या मालिकेनिमित्त (वज्र प्रोडक्शन्सकडून) श्वेता शिंदे म्हणाल्या, “गेली काही वर्षे आमच्या वज्र प्रोडक्शन्सकडून कलर्स मराठी वाहिनीसाठी मालिका निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आम्ही प्रयत्न करत होतो. आजवर वज्र प्रोडक्शन्स नी अनेक दर्जेदार मालिकांची निर्मिती केली आहे . ग्रामीण भागातील विविध संवेदनशील विषय अत्यंत मनोरंजकपणे मांडले आहेत. मनाला स्पर्श करणारी पात्रं तिथल्याच मातीतली वाटतील याची आम्ही नेहमीच काळजी घेतली आणि त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा पण आज त्यांचंच जगणं अवघड होऊन बसलंय शेतकरी नवरा कोणालाच नको आहे. शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी पण मुलगी द्यायला तयार नाही तर इतरांचं काय, कलर्स मराठी वाहिनीने आम्हाला "शेतकरीच नवरा हवा" ही मालिका बनवण्याची संधी दिली व सध्या ग्रामीण भागात भेडसावणाऱ्या समस्येवर आम्हाला प्रकाश टाकता आला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार ही मालिका पाहून चार मुली जरी म्हणाल्या की "शेतकरीच नवरा हवा" तरी आमच्या कष्टाचं सार्थक होईल.

तेव्हा नक्की बघा "शेतकरीच नवरा हवा" १४ नोव्हेंबरपासून सोम ते शनि संध्या ६.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive