'होऊ दे धिंगाणा'च्या मंचावर पहिल्यांदांच ‘मुलगी झाली हो’ मालिकेतली माऊ बोलणार!

By  
on  

स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. याच प्रेमापोटी हा कार्यक्रम महाराष्ट्रातला नंबर वन कथाबाह्य कार्यक्रम ठरला आहे. आता होऊ दे धिंगाणाचा यावेळेचा एपिसोड रंगणार आहे ‘आई कुठे काय करते’ आणि ‘मुलगी झाली हो’च्या टीममध्ये. मुलगी झाली हो मालिकेतील माऊ पहिल्यांदाच या मंचावर बोलणार आहे. आजवर प्रेक्षकांनी माऊचा आवाज ऐकलेला नाही. आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर पहिल्यांदाच माऊचा आवाज ऐकायला मिळणार आहे.

माऊची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पुगावकरसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. गेले दोन वर्ष दिव्या माऊची व्यक्तिरेखा फक्त साकारत नाहीय तर ती जगतेय. माऊ कधी बोलणार हा प्रश्न प्रेक्षक सतत विचारायचे. आता होऊ दे धिंगाणामुळे हा सुवर्णयोग जुळून आला आहे. ढोल ताश्यांच्या गजरात माऊची एण्ट्री होणार आहे. खरतर या कार्यक्रमातच खूप सारी ऊर्जा सामावलेली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सिद्धार्थ जाधव तर सळसळता उत्साह आहेत. या मंचामुळे माऊची बोलण्याची इच्छा पूर्ण होणार आहे अशी भावना दिव्याने व्यक्त केली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

तेव्हा आता होऊ दे धिंगाणाचा हा खास भाग नक्की पाहा येत्या शनिवारी रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Recommended

Loading...
Share