'जिवाची होतिया काहिली' मालिकेचे १०० भाग पूर्ण, मालिकेच्या सेट वर विशेष सेलिब्रेशन

By  
on  

  सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यग्र आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'जिवाची होतिया काहिली' या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. मराठी भाषिक आणि कानडी भाषिक यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसते आहे.

प्रमुख नायकाच्या भूमिकेत  कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवलकर हिचा कानडी अंदाजसुद्धा  प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. मालिका आता वेगळ्या वळणावर पोचली आहे.

         अर्जुन रेवथीच्या प्रेमात पडला असून रेवथीनेही मैत्रीचा हात पुढे केला आहे आणि मालिका वेगळे वळण घेते आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्यात चांगली मैत्री झाली असून अर्जुन आपले प्रेम व्यक्त करणार का, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. त्यातच आता मालिकेत नवीन  व्यक्तिरेखा पाहायला आहे. त्यासोबतच मालिकेचे १०० भाग आज पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने मालिकेचा सेट वर सम्पुर्ण कलाकार एकत्र येऊन  सेलिब्रेशन केले आहे. 

 पाहा, 'जिवाची होतिया काहिली', सोमवार ते शनिवार, संध्या. 7.30वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Recommended

Loading...
Share