'तुमची मुलगी काय करते?' मालिका आता बंगाली भाषेमध्ये डब होणार!

By  
on  

सोनी मराठी वाहिनीवरील वेगळ्या  धाटणीची अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'तुमची मुलगी काय करते?'. चित्तथरारक अशा या  मालिकेत अनेक रंजक ट्विस्ट आलेले पाहायला मिळत असतात. नुकतेच या मालिकेचे ३०० भाग पूर्ण झाले आहेत.  मालिकेचा ३००वा भाग सेटवर केक कापून संपूर्ण चमूने  उत्साहात साजरा केला.  या मालिकेचे बंगाली भाषेत डबिंग होणार असल्यामुळे ह्या उत्साहात भर पडली आहे. 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट ठरणार आहे. 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेची लोकप्रियता यातूनच आपल्याला समजते आहे.  सोनी आठ या वाहिनीवर ही मालिका आपल्या भेटीस येणार आहे. 
   

'तुमची मुलगी काय करते?' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली असून ३०० भाग पूर्ण होणे आणि मालिका बंगाली भाषेत डब होणे, हा या मालिकेसाठी मौल्यवान आणि महत्त्वाचा क्षण  ठरला आहे. 

पाहायला विसरू नका, 'तुमची मुलगी काय करते?' सोम. ते शनि. रात्री 10 वाजता. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Recommended

Loading...
Share