कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेत अंतरा – मल्हार आजवर अनेक आव्हानांना सामोरे गेले. अनेक कसोट्या त्यांनी एकत्र मिळून पार केल्या. काही अडचणींमध्ये अंतराला मल्हारची साथ मिळाली तर कधी सुहासिनी तिच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. गेल्या काही दिवसांपासून अंतरा आणि मल्हारवरील संकंट कमी होण्याचे नाव घेत नाही. आणि आता देखील मल्हारच्या हाताला दुखापत झाल्याने त्याची सर्जरी होणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी तिला पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे सर्जरी कशी निर्विघ्नपणे पार होईल हे अंतराच्या समोरच सगळ्यात मोठं आव्हानं आहे. आणि तेच पूर्ण करण्यासाठी अंतराने रेसमध्ये सहभागी होण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. आणि याच रेसमध्ये आयोजक म्हणून मालिकेत नवी एंट्री होणार आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता देवदत्त नागे जीव माझा गुंतला मालिकेत तुषार देसाई हे महत्वपूर्ण पात्र साकारणार आहे. आता हे पात्र निगेटिव्ह असेल कि मल्हार - अंतराला या कठीण परिस्थितून मदत करेल हे हळूहळू उलघडेल. मालिकेत लवकरच रेस सुरु होणार आहे आणि अंतरा देखील त्यामध्ये सहभागी होणार आहे. बघूया या रेसमध्ये ती जिंकू शकेल ? कि पिंट्याभाऊ आणि चित्राची खेळी सशस्वी ठरेल ?
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना देवदत्त म्हणाला, मी जेव्हा हि मालिका बघितली तेव्हा माझा जीव त्याच्यामध्ये गुंतला असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा मला या भूमिकेविषयी विचारणा झाली मी लगेच होकार दिला. हि भूमिका स्वीकारण्यामागे अजून एक उद्देश होता कि, एक चांगली मालिका जी ५०० भागांचा टप्पा लवकरच गाठणार आहे त्या मालिकेचा आपण एक भाग बनणं एक खरंच खूप महत्वाचं आहे. या पात्राबद्दल विचार केला, कसं पुढे जाणार आहे, पात्र नक्की काय आहे, आणि प्रेक्षकांचा विचार केला... मला असं वाटलं हे तुषार देसाई पात्र नक्कीच तुम्हां प्रेक्षकांना आवडेल म्हणून होकार दिला. या character चा स्वभावचं तुम्ही समजू शकणार नाही असं मला वाटतं आणि हेच माझ्यासाठी आव्हानं आहे. कितीही काही म्हंटलं तरी मी कितीही हिंदी मराठी चित्रपट केले तरीसुद्धा मला टेलिव्हिजनने खूप काही दिलं आहे आणि टेलिव्हिजनवर असं character करणं हि माझ्यासाठी सुवर्णसंधी आहे."
पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी बघत राहा जीव माझा गुंतला सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.