Photos : 'जय जय स्वामी समर्थ' दत्त जयंती विशेष !

By  
on  

जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामींच्या अगाध लीला पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच आसुसलेले असतात.मालिकेनं अल्पावधीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मालिकेत अभिनेता अक्षय मुदवाडकर यानं स्वामींची मुख्य भूमिका साकारली आहे.

 आज स्वामी समर्थ दत्त अवतार घेणार आहेत. दत्त जयंती निमित्त हा विशेष भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

दत्त जयंतीनिमित्त प्रेक्षकांना स्वामींच्या दत्त अवताराचं दर्शन घेता येणार आहे. 

मालिकेच्या दत्त जयंती विशेष भागात आपण पाहणार आहोत की, चेटूकवाला एकनाथ त्याच्या तंत्र मंत्र विद्येच्या मदतीने स्वामी समर्थांना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो.

पण स्वामींच्या दैवी सामर्थ्यासमोर त्याचे सगळे प्रयत्न अपयशी ठरतात.

राग अनावर होऊन एकनाथ साक्षात स्वामींवर कुऱ्हाड ऊगारतो, त्याच क्षणी स्वामी त्याला दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देतात.

सगळ्यांवर ज्याची दहशत आहे तो एकनाथ गुरुंचा स्विकार करुन स्वामींना शरण जाईल का?


 

Recommended

Loading...
Share