स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एकीकडे अरुंधती आपलं नवं आयुष्य सुरु करु पहातेय तर दुसरीकडे अनघाच्या आयुष्यातही नवा पाहुणा येणार आहे. अनघा लवकरच आई होणार असून देशमुख कुटुंबाने थाटामाटात अनघाचं डोहाळजेवण करायचं ठरवलं आहे.
देशमुख कुटुंबात प्रत्येक सण-समारंभ अगदी उत्साहात साजरा केला जातो. अनघाच्या डोहाळ जेवणाला सुद्धा संपूर्ण देशमुख कुटुंब एकत्र येऊन जल्लोष करणार आहे.
एकीकडे आनंदाचं वातावरण असलं तरी या खास प्रसंगी अभिषेकचं एक खास गुपित संपूर्ण कुटुंबासमोर उघड होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अभिषेकचा बदलेलला स्वभाव अरुंधती आणि अनघासोबतच घरातील प्रत्येकालाच खटकतोय.
अनघाच्या डोहाळ जेवणाला अभिषेकचं खरं रुप प्रेक्षकांसमोर येणार आहे.
आयुष्यातल्या या नाजूक वळणावर अनघाचा निर्णय नेमका काय असणार देशमुख कुटुंब तिला कसं साथ देणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. त्यासाठी न चुकता पाहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.