By  
on  

Video : आता हा अभिनेता छोट्या पडद्यावर साकारणार स्त्री भूमिका, प्रोमो पाहिलात का?

    सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता 'प्रतिशोध' ही मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहेत. निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल   बावडेकर  आता अजून एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

‘प्रतिशोध – झुंज अस्तित्वाची…..’ ही नवी मालिका सुरु होणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत एक मुलगी आणि तिची आई सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात दागिने खरेदी करताना दिसत आहे. यावेळी ती मुलगी दागिने खरेदी करत असताना अचानक काही माणसं येऊन त्या बाईला गाडीत टाकून घेऊन जातात, असे या प्रोमोत पाहायला मिळत आहे. या मालिकेत एका स्त्रीपात्राची भूमिका पुरुष कलाकार साकारत आहे. अभिनेता अमोल बावडेकर हा या मालिकेत स्त्रीपात्र साकारताना दिसणार आहे. एका तरुण मुलीच्या आईचे पात्र अमोल रंगवणार आहे.  

 'प्रतिशोध' या नव्या कोऱ्या मालिकेतून अमोल   बावडेकर  यांचा हा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ममता असे या व्यक्तिरेखेचे नाव आहे. अमोल  बावडेकर सोबतच पायल मेमाणे हि सुद्धा पाहायला मिळत आहे. ममताच्या मुलीची म्हणजेच दिशा ची व्यतिरेखा यात ती साकारताना दिसणार आहे.  पण  मालिकेत भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांच्या भविष्यात काय अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळेल.

निरनिराळ्या धाटणीच्या मालिका आणि विषय सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळत आहेत. त्यातच आता एक थरारक मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेची पहिली झलकदेखील उत्कंठावर्धक रितीने प्रेक्षकांसमोर येते आहे आणि पुढचे कथानकही रोमांचक पद्धतीने  रंगेल यात काही शंका नाही.

 

 भूतकाळाची सावली बदलणार भविष्याची दिशा पाहायला विसरू नका 'प्रतिशोध' झुंज अस्तित्वाची १६ जानेवारी २०२३ पासून सोम. ते शनि. रा. १० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive