महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. केवळ मराठीच नाही, तर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. याचे दाखले हास्यजत्राच्या कलाकारांना प्रवासात नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत. हा कार्यक्रम आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून जगभरात प्रसिद्ध आहे. प्रेक्षक या कार्यक्रमाकडे निखळ मनोरंजनाचं साधन म्हणून पाहत असतो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचे चाहते दिग्गज कलावंत आणि मोठी व्यक्तिमत्त्वं आहेत आणि अशा कलावंतांनी हास्यजत्रेत सहभाग घेतला आहे. आता बॉलिवूडच्या शिखरावर पोचलेला दिग्गज अभिनेता रणवीर सिंग 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात प्रहसन सादर करणार आहे.
समीर चौघुले,गौरव मोरे, शिवली परब, दत्तू मोरेंचे कलाकार रणवीर सिंग सोबत स्कीट सादर करताना दिसणार आहेत. सोबत महाराष्ट्राचा एनर्जेटिक सुपरस्टार सिद्धार्थ जाधव देखील असेल. सर्कस सिनेमाचा चमू 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात उपस्थित असणार आहे.
विशेष म्हणजे ज्यावेळी सर्कस सिनेमाची शूटींग सुरु होती तेव्हापासूनच महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात जायचे अशी चर्चा कलाकारणमध्ये सुरु होती. शेवटी प्रदर्शनाची तारीख ठरली तेव्हा सगळ्या कलाकारांना महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात जाण्याची उत्सुकता होती. असे कलाकारांनी सांगितले. विशेष म्हणजे रणवीर सिंग यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहायला सुरवात केली आणि सलग २तास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम पाहताना मंत्रमुग्ध झाले. त्यांचा तो उत्साह आपल्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या या भागात आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल.
त्या वेळी रोहित शेट्टी, रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडीस, वरुण शर्मा, सिद्धार्थ जाधव, अश्विनी काळसेकर आणि विजय पाटकर हे उपस्थित असणार आहेत आणि हास्याच्या मंचावर हास्याचे फटाके फुटणार आहेत. मंचावर एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळणार आहे. रोहित शेट्टी यांची सर्कस हास्यजत्रेच्या मंचावर आल्याने मंचावर घडलेली धमाल पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. सर्कस टीम ने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात हजेरी लावली आहे. त्यामुळे साहजिक चाहत्यांमध्ये हा भाग बघण्याची उत्सुकता वाढली आहे. प्रेक्षकांना धमाल विनोदी स्किट्स आणि सर्कस चित्रपटातील किस्से ऐकायला मिळणार आहेत.
पाहायला विसरू नका 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' १९ आणि २० डिसेंबर सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.