By  
on  

मधुरा देशपांडे आणि यशोमान आपटे यांचा ‘शुभविवाह’ प्रवाह दुपारमध्ये

मनोरंजनाच्या प्रवाहात दर्जेदार मालिका सादर करत स्टार प्रवाह वाहिनीने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. सातत्याने नाविन्याची कास धरत निखळ मनोरंजन देण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा प्रयत्न असतो. नव्या वर्षात नव्या मालिकेची भेट प्रेक्षकांना देण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. प्राईम टाईम मध्ये दाखवल्या जाणाऱ्या सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच प्रेक्षकांची दुपारही मनोरंजनाने परिपूर्ण करण्याचा स्टार प्रवाहचा प्रयत्न आहे. मुरांबा आणि लग्नाची बेडी या दोन मालिका पाहिल्याशिवाय प्रेक्षकांच्या दुपारच्या जेवणाची रंगत वाढत नाही. प्रेक्षकांची दुपार आता आणखी खास होणार आहे. कारण नव्या वर्षात म्हणजेच १६ जानेवारीपासून दुपारी २ वाजता सुरु होतेय नवी मालिका शुभविवाह. बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट म्हणजे शुभविवाह ही मालिका. मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल देशपांडे, शीतल शुक्ल, मनोज कोल्हटकर, विजय पटवर्धन अशी कलाकारांची तगडी फौज मालिकेत आहे.

या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘शुभविवाह ही नाते संबंध जपणारी कथा आहे. आयुष्य आपल्या समोर नेहमी एक आव्हान घेऊन उभं रहातं. ते आव्हान हसतमुखाने सामोरं जाणाऱ्या भूमी या मुलीची ही कथा आहे. विवाह बंधन हे शुभं असतं, एकमेकांच्या विश्वासाचं असतं. या मालिकेत हीच वचनं, हेच संबंध कसे टिकवून ठेवायचे हा प्रवास पहायला मिळेल. आयुष्य सुंदर आहे, ते तसं पहाता आलं पाहिजे हे सांगणारी मालिका आहे शुभविवाह.’

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना अभिनेत्री मधुरा देशपांडे म्हणाली, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना अतिशय आनंद होत आहे. भूमी हे पात्र साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे. कारण भूमीसारखी इतका पराकोटीचा त्याग करणारी व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारते आहे. भूमीचे नवनवे पैलू मला दररोज उलगडत आहेत. आमची टीम खूप छान आहे. त्यामुळे शुभविवाहच्या निमित्ताने एक छान कुटुंब प्रेक्षकांच्या भेटीला येईल.’

भूमीच्या सावत्र बहिणीची म्हणजेच पौर्णिमा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री कुंजिका काळविंट म्हणाली, ‘मी गेले वर्षभर एका चांगल्या कथानकाच्या आणि चांगल्या पात्राच्या शोधात होते. शुभविवाह ही मालिका म्हणजे माझी स्वप्नपूर्ती म्हणता येईल. या मालिकेच्या निमित्ताने नव्या वर्षाची दमदार सुरुवात होणार आहे. पौर्णिमा या पात्राकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. ही भूमिका साकारताना माझा कस लागतोय असं म्हण्टलं तरी वावगं ठरणार नाही. स्टार प्रवाहसोबत माझी पहिली मालिका आहे त्यामुळे खूपच उत्सुकता आहे. तेव्हा १६ जानेवारीपासून दुपारी २ वाजता पाहायला विसरु नका नवी मालिका शुभविवाह फक्त स्टार प्रवाहवर.’

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive