By  
on  

'आई कुठे काय करते'च्या सेटवर आली चिमुकली पाहुणी, अनिरुध्द देशमुखने शेयर केला गोड Video

छोट्या पडद्यावरची आई कुठे काय करते मालिका सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अनेक ट्विस्ट आणि टर्न्स मालिकेत नेहमी पाहायला मिळतात. मालिकेत नुकतंच अभिषेक आणि अनघाला मुलगी झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. या बाळाला पाहण्यासाठी देशमुख  कुटुंब उत्सुक आहेतच परंतु, त्यापेक्षाही देशमुखांच्या नातीला पाहण्यासाठी प्रेक्षक जास्त उत्सुक आहेत.

प्रोमोमध्ये त्या चिमुकलीला पाहून प्रेक्षक तिच्या प्रेमात पडले आहेत. आता मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्या मुलीचा एक गोंडस व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या गोंडस परीचं नाव त्विशा असून ती आल्यापासून सेटवरचं सगळं वातावरणच बदलून गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सोबतच मिलिंद यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेयर केली आहे. 

मिलिंद गवळी लिहतात, " गोड गोंडस परी राणी”त्विशा”...“आई कुठे काय करते “ या मालिकेमध्ये देशमुख कुटुंबात आता आली आहे एक
नवीन मेंब
कसली गोंडस आहे “ त्विशा “ .
सहसा लहान मुलं दुसऱ्या कोणाकडे अशी पटकन जात नाही,
पण हे बाळ अगदी हसत खेळत माझ्याकडे आलं,
असं वाटलं नाही की पहिल्यांदाच हिला आपण पाहिलंय,
भेटलोय, अगदी आपल्या कुटुंबांमध्ये एक नवीन मेंबर आला आहे असंच वाटत होतं,
तिने क्षणात सगळ्यांनाच आपलंसं करून घेतलं.
लहान बाळ असेल तर आपोआपच भाभी चैतन्य पसरतं,
जीवन किती सुंदर आहे असं वाटायला लागतं,
चेहऱ्यावरील निरागस हास्य,
आमच्या सेटवरचे वातावरणच बदलून गेलं आहे.
प्रेक्षकांना सूधा खूप छान वाटणार आहे बाळाच्या आजूबाजूला घडणारे प्रसंग बघून ."

 

 

मिलिंद यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते चिमुकलीसोबत खेळताना दिसतायत. तिच्याशी बोलून तिला हसवताना दिसतायत. अभि-अनघाच्या लेकीला आणि देशमुखांच्या नातीला मालिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive