कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. कावेरी समोर वैदेहीचा खरा चेहरा आला आणि तिने राज आणि वैदेहीचे लग्न थांबवले. कावेरीचे राजवर प्रेम आहे हे वैदेहीला पहिल्यापासून माहिती असून ती अनभिज्ञ आहे असे दाखविले यामुळे कावेरी दुखावली गेली. तिने सगळ्यांसमोर वैदेहिचा पर्दाफाश केला आणि राजवर तिचे अपर प्रेम आहे अशी कबुली दिली. पण तात्यांनी मात्र याला नकार दिला आणि कावेरीला तिथून घेऊन गुहागरला निघून गेले. आता राजसमोर खूप मोठे आव्हान आहे जे तात्यांनी त्याला दिले आहे. तात्यांनी राजला चॅलेंज दिले आहे की या गावात राहून दाखव कमवून दाखव... आणि ते राजने स्वीकारले देखील आहे. आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. या चॅलेंजमध्ये राज स्वतःला कसं सिध्द करेल ? कसं हे आव्हानं पूर्ण करेल ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
मालिकेमध्ये राज विटांच्या भट्टीवर राबताना दिसणार आहे. शेतकाम तसेच टेम्पो ड्रायव्हर चे काम करताना दिसणार आहे. तात्यांच्या टपरीवर धुणे भांडी चे काम देखील करताना दिसणार आहे. राज म्हणेजच विवेक सांगळे याने हे sequence करताना खूप मेहेनत घेतल्याचे दिसून येते.
अखेर प्रेक्षक जे क्षण बघायला आतुर होते ते मालिकेत बघायला मिळणार आहे. राज कावेरी मध्ये आता प्रेम बहरू लागले आहे... त्यांच्यातील काही रोमँटिक क्षण मालिकेत बघायला मिळणार आहे. तसेच एक सरप्राइज देखील आहे जे लवकरच प्रेक्षकांना कळेल.
कावेरीच्या प्रेमापोटी राज हे करण्यास तयार होतो...पण तो यात यशस्वी होईल जाणून घेण्यासाठी बघत राहा भाग्य दिले तू मला सोम ते शनि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.