सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेली 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' ही मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. बायोच्या शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. मालिकेत आता भरती आणि शुभांकर यांच्या लग्नामुळे मालिकेने वेगळे वळण घेतले आहे. त्याचे परिणाम भारती आणि बायो यांना भोगावे लागत आहेत.
आता मालिकेत गौतमीची एन्ट्री पाहायला मिळणार आहे. गौतमीची भूमिका स्वप्नाली पाटील ही अभिनेत्री करते आहे. गौतमी ही शुभांकरची पूर्वपत्नी असून. तिची एन्ट्री सध्याच्या वळणावर होणं, ही शुभांकरसाठी चिंतेची बाब ठरणार आहे. शुभांकरला भेटण्याआधी गौतमीची भेट बायोसोबत होते. बायो आणि गौतमी यांच्यातला एक प्रसंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढे गौतमीच्या येण्यावरून देवचक्के कुटुंबात काही वादळ निर्माण होणार आणि बायो आणि भारती यांच्यावर याचे काय परिणाम होतील, हे पाहायला मिळेल
. स्वप्नाली पाटील काही नकारात्मक भूमिकांमधून याआधी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. प्रेक्षकांनीदेखील तिच्या भूमिकेची चांगली दाखल घेतली होती. शिक्षणाच्या जिद्दीच्या ह्या अनोख्या प्रवासात बयो डॉक्टर होण्याचं स्वप्न कसं पूर्ण करणार, हे पाहण्यासाठी सोनी मराठी वाहिनीवरली 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' ही मालिका नक्की पाहा.
पाहा, 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं', सोम.-शनि., रात्री 8.30 वा. सोनी मराठी वाहिनीवर.