रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा आणि कार्तिक पुन्हा एकदा सर्वांच्या साक्षीने विवाहबंधनात अडकणार आहेत. गैरसमज दूर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने दोघांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होतेय.
मेहंदी आणि हळद थाटात पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्याची. इनामदार कुटुंबाच्या खास परफॉर्मन्स सोबतच स्टार प्रवाह परिवाराची उपस्थिती या संगीत सोहळ्याची रंगत आणखी वाढवणार आहे.
ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पू-शशांक आणि लग्नाची बेडी मालिकेतील सिंधू-राघवचा खास परफॉर्मन्स संगीत सोहळ्यात असेल. तर तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मल्हार आणि स्वराजने खास गाणं सादर केलं आहे.
दीपा कार्तिकचा संगीत सोहळ्यातला लूक लक्ष वेधणारा असेल. काळ्या रंगाच्या द्वेष करणाऱ्या सौंदर्याच्या मतपरिवर्तनानंतर संगीत सोहळ्यासाठी काळ्या रंगाला विशेष पसंती देण्यात येणार आहे. ब्लॅक इज ब्युटिफूल म्हणत खुद्द सौंदर्या इनामदारनेच दीपा-कार्तिकचा वेडिंग लूक डिझाईन केला आहे. तेव्हा हा खास संगीत सोहळा पाहायला विसरु नका रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.