By  
on  

'पिरतीचा वणवा उरी पेटला'च्या सेटवर चहा पार्टी

कलर्स मराठीवर नुकत्याच सुरु झालेल्या पिरतीचा वनवा उरी पेटला मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत अर्जुनाचा swag आणि सावीचा तडफदारपणा लोकांची मन जिंकत आहे. सावीची भूमिका रसिका तर अर्जुनची भूमिका इंद्रनील साकारत आहेत. मालिका सुरु होऊन काही दिवसच झाले असून सावी आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सावी आणि अर्जुन आता प्रेक्षकांना आपल्या घरातील सदस्य वाटू लागले आहेत. . पडद्यावर जरी हे एकमेकांविरुद्ध दिसत असले तरीदेखील पडद्यामागे मात्र यांची धम्माल मस्ती सुरु आहे.

मालिकेचे शूट नाशिकमध्ये सुरु आहे. सध्या सगळीकडेच थंडीचे दिवस सुरु आहेत आणि त्यामुळेच आपल्या अर्जुन आणि सावीने म्हणेजच इंद्रनील आणि रसिकाने मालिकेच्या संपूर्ण crew साठी  स्पेशल चहा बनवला. सेटवर सगळेच कलाकार आणि इतर सदस्य या चहाचा आस्वाद घेताना दिसले. एकत्र चहा पिताना सेटवर बऱ्याच गप्पा रंगल्या  आपण ते म्हणतो ना "चाय पे चर्चा". सेटवर कलाकार असेच बऱ्याचद धम्माल मस्ती करताना दिसतात. गरमा गरमा भज्या तळणे असो वा भुट्टा खाणे असो वा वाफाळता चहाचा आस्वाद घेणे असो वा हुरडा पार्टी असो. याचनिमित्ताने सगळ्यांना एकत्र येऊन काही वेळ गप्पा गोष्टी करण्याचा वेळ मिळतॊ. 
 

 

तेव्हा मालिकेमध्ये काय काय घडेल ? सावी आणि अर्जुन एकमेकांसमोर आल्यावर प्रीतीचा वणवा पेटणार उरी ? जाणून  घेण्यासाठी बघत राहा पिरतीचा वनवा उरी पेटला सोम ते शनि रात्री १०.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive