Video : भूमी आणि आकाशने ४० फूट उंच मंदिराच्या कळसावर चढून सीन केला पूर्ण

By  
on  

स्टार प्रवाहच्या परिवारात नव्याने दाखल झालेल्या ‘शुभविवाह’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. या मालिकेत नुकताच एक प्रसंग चित्रित झाला. या सीनमध्ये मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात आकाश चक्क मंदिराच्या कळसावर चढतो. आपला जीव धोक्यात घालून निरागस जीवाला वाचवण्याची आकाशची धडपड असते.

आकाश धाडसाने कळसावर चढतो खरा मात्र त्यानंतर भीतीने त्याची गाळण उडते. याप्रसंगी भूमी येऊन आकाश आणि मांजरीचा जीव वाचवते. मालिकेत दाखवल्या गेलेल्या या प्रसंगाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सिनेमामध्ये अश्या पद्धतीचे स्टण्ट सीक्वेन्स आपण पहात असतो. मात्र शुभविवाह मालिकेच्या संपूर्ण टीमने हे आव्हान स्वीकारत हा धाडसी प्रसंग पूर्ण केला.

खास बात म्हणजे हा सीन पूर्ण करणाऱ्या भूमी आणि आकाशचं म्हणजेच अभिनेत्री मधुरा देशपांडे आणि यशोमान आपटेचं विशेष कौतुक. बॉडी डबल न वापरता या दोघांनीही हा सीन पूर्ण केला. अर्थातच हा सीन शूट करताना सर्वोतोपरी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. काही मिनिटांचा हा सीन कित्येक तास सुरु होता. दिग्दर्शक आणि फाईट मास्टरच्या मार्गदर्शनाखाली हा सीन पूर्ण करण्यात आला.

अभिनेता यशोमान आपटे आणि मधुरा देशपांडे या दोघांनीही अश्या पद्धतीचा सीन पहिल्यांदाच केलाय. सुरुवातीला खूप भीती वाटत होती. मात्र टीमच्या सहकार्यायमुळे आणि उत्तम नियोजनामुळे हा सीन पूर्ण करता आला अशी भावना मधुरा आणि यशोमान यांनी व्यक्त केली. तेव्हा पाहायला विसरु नका शुभविवाह दुपारी २ वाजता फक्त स्टार प्रवाहवर. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Recommended

Loading...
Share