By  
on  

'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेत प्रजासत्ताक दिनानिमित्त सैन्यदलासाठी विशेष शुभेच्छा पत्रे

                      सोनी मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. आता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळते आहे.  'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झाली आहे. वेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. पारगावातल्या पोस्ट ऑफीसमधील ही गोष्ट आहे. या मालिकेतल्या कुलकर्णी, गुळस्कर, निरगुडकर अश्या काही व्यक्तिरेखा  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. पोस्ट मास्टर कुलकर्णी यांना प्रतीक्षा आहे त्यांच्या बदलीची तसेच निरगुडकरांना चिंता आहे रंजना काय म्हणेल याची. मालिकेत आता २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील  मुलांनी भारतीय सैनिकांसाठी शुभेच्छा पत्रं  तयार केली आहेत. ती शुभेच्छा पत्रं एवढी सुंदर  लिहिली आहेत की, पोस्टातील कर्मचारी ती पत्रं सैन्यदलापर्यंत स्वखर्चानी पोचवणार आहेत. मुलांच्या भावना व देशावरचं प्रेम त्या पत्रांतून व्यक्त झालं आहे. पोस्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने ती पत्रं सैन्यदलापर्यंत  पोचवली आहेत.  

                    पाहायला विसरू नका, नवी मालिका - 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...',  गुरुवार ते शनिवार रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Recommended

PeepingMoon Exclusive