By  
on  

'जिवाची होतिया काहिली' या मालिकेत प्रदीप वेलणकर तात्यांच्या भूमिकेत.

सोनी मराठी वाहिनीवरील  'जिवाची होतीया काहिली' ही मालिका महाराष्ट्र आणि कानडी यांच्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवलकर हिचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांना आवडतो आहे. मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते आहे. सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यग्र आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'जिवाची होतिया काहिली' या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. सध्या मालिका रंगतदार वळणावर येऊन पोचली आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते आहे. 
       

 सध्या गावात मराठी शाळा बंद करण्यावर अप्पा भर देत आहेत. त्याविरुद्ध अर्जुनचा लढा सुरू आहेच, पण तात्यांचे गावात पुनरागमन झाले आहे. ते आता अर्जुनला कशा प्रकारे मदत करतील, हे पाहायला मिळेल. पण मालिकेत आता तात्यांचा भूमिकेत प्रदीप वेलणकर पाहायला मिळणार आहेत. निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणारे दिग्गज अभिनेते प्रदीप वेलणकर आता तात्यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तात्यांचे महाराष्ट्रावरील प्रेम आणि मराठी भाषेवरील प्रभाव प्रदीप वेलणकर कशा प्रकारे निभावतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अर्जुन आणि रेवथी यांचे प्रेम यापुढे कसे फुलत जाणार आहे, हे पाहायला मिळेल. 
                 

  मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी पाहायला विसरू नका,  'जिवाची होतिया काहिली' सोम. ते शनि. संध्या. 7.30 वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive