By  
on  

Video : कुटुंबाच्या भल्यासाठी पशा घेणार मोठा निर्णय... पाहा ‘सहकुटुंब सहपरिवार’

सहकुटंब सहपरिवार  ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका.  गुण्यागौोविंदाने एकत्र राहणा-या मोरे कुटुंबियांची ही गोष्ट अवघ्या महाराष्ट्राच्या आवडीची आहे. सुख-दुख:त आणि कठीण प्रसंगात नेहमीच एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे मोरे बंधू आणि त्यांची कधीगी साथ न सोडणा-या त्यांच्या पत्नी ही या मालिकेची खासियत. मोरे कुटंबावर सध्या दुखचा डोंगर कोसळला आहे. चार भावंडांमधील सर्वांचा लाडका पश्याचं निधन झालं आहे. एका अपघातात पश्या व त्याचा टेम्पो जळून खाक झाला होता. 

अंजी आणि पश्याची लव्हस्टोरी सर्वांनाच माहितीय. पश्याच्या अकाली निधनाने अंजी खुप बदललीय. तिने बरंच सहनही केलंय. पण संपूर्ण मोरे कुटुंबियांच्या साथीने अंजी आता हळूहळू सावरतेय. नव्या आयुष्याची सुरुवात करतेय. पश्याच्या विम्याचे पैसे अंजीला मिळाले आहेत. तो तीस लाखांचा चेक दुकानासाठी ती सूर्या दादाच्या हाती सोपवतेय.

दरम्यान नियतीच्या मनात काहीतरी भलतंच आहे, पश्याचा अपघात झाला तेव्हा त्याचा टेम्पो जळून खाक झाला होता. तेव्हा त्याचा मृतदेह कोणालाच सापडला नव्हता. पण पश्या मेलाच नव्हता तो जिवंत होता. एका सदगृहस्थांनी जखमी पश्याची सेवा करुन त्याचा जीव वाचवला. आता बरा झालेला  पश्या पुन्हा आपल्या कुटुंबियांच्या ओढीने आणि अंजीच्या प्रेमाखातर घराच्या दिशेने कूच करतो. दुकानाच्या इथे येतो आणि विम्याच्या पैशाने कुटुंबाचं झालेलं भलं पाहून एक वेगळाच निर्णय घेतो, ती म्हणजे कायमचं इथून दूर जाण्याची. 

 

 

अंजी आणि पश्याची पुन्हा भेट होणारच नाही का...पश्या अंजी समोर कधी येणार हे आता येणा-या भागात कळेल. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive