By  
on  

“पिरतीच्या फडात गं…” , 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'चला हा येऊ द्या'च्या कलाकारांची ख-या आयुष्यात जमली जोडी?

कलाकारांची सेटवर मनं जुळणं, एकाच क्षेत्रात असल्याने लग्नाचा निर्णय घेणं हे चित्र सध्या सतत पाहायला मिळतंय. कलाक्षेत्रातील आता आणखी एका जोडीच्या नात्याची चर्चा रंगलीय. कारण, या जोडीनेच सोशल मिडीयावरुन तसा इशारा दिला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात सुमीत लोंढेबरोबर लग्नबंधनात अडकली. त्यानंतर आता आणखी एका जोडीची चर्चा होऊ लागली आहे. ‘चला हवा येऊ द्या फेम’ स्नेहल शिदमने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निखिल बने याच्याबरोबर एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. त्यावरून चाहते त्यांच्या नात्याबदद्ल तर्क लावत असून चर्चांना एकच उधाण आलं आहे. 

स्नेहलने शेअर केलेल्या या फोटोत तिच्याबरोबर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल बने दिसतोय. त्यांनी एकमेकांच्या हातात हात घेतला आहे आणि स्नेहल लाजताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने
“पिरतीच्या फडात गं
धरला हात असा
काळीज येंधलं आरल….
” असं कॅप्शन दिलं आहे.

 

या फोटोला तिने ‘बेस्ट फ्रेंड वेडिंग’, ‘वेडिंग सीझन’ व ‘वी आर जस्ट फ्रेंड्स’ असे हॅशटॅग दिल्याचं पाहायला मिळतंय.

Recommended

PeepingMoon Exclusive