By  
on  

तुला शिकवीन चांगलाच धडा ! शिवानी रांगोळे आणि हृषिकेश शेलार जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आणि चर्चा सुरु झाली ती हृषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे या जोडीची, ही जोडी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. सोबतच या मालिकेच्या निमित्ताने अजून एक सरप्राईझ प्रेक्षकांसाठी असणार आहे ते म्हणजे हृषिकेश आणि शिवानी सोबत कविता लाड-मेढेकर आणि विजय गोखले हे देखील मध्यवर्ती भूमिकेत असणार आहेत. कविता लाड आणि विजय गोखले बऱ्याच काळानंतर डेलीसोप मध्ये दिसणार आहेत. 

ही मालिका आहे एका शिक्षिकेची म्हणजेच अक्षराची जी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, आणि अधिपतीची जो कमी शिकलेला पण गर्भ श्रीमंत आहे. अक्षरा सुंदर, सुशिक्षित, गुणी आणि तत्वनिष्ठ मुलगी आहे तिची शिक्षणाविषयी ठाम भूमिका आहे, शिक्षण फक्त प्रगती करत नाही तर चरित्र घडवत. तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करत असं तीच म्हणणं आहे, म्हणून तिने शिक्षण क्षेत्र स्विकारलं. तर दुसरीकडे मालिकेचा नायक अधिपतीचे अनेक व्यवसाय आहेत, त्याच्या मालकीची एक शाळा देखील आहे. पण त्याने नववीनंतर शिक्षण सोडलं कारण त्याच्या आईच म्हणणं आहे की शिक्षणाने कुणाचं भलं होत नाही, शिक्षण हे गरिबांसाठी असत त्यामुळे त्यांना नोकरी लागते, अधिपतीसाठी शिक्षण कधीही त्याच्या आड आलं नाही कारण त्याने अनेक व्यवसाय यशस्वीपणे केले आहेत. अधिपतीच आईवर खूप प्रेम आहे, अधिपती अक्षराच्या प्रेमात पडला पण मनातून खुश नसूनही आईने त्या दोंघाच लग्न लावून दिलंय. 

कोल्हापुरात होणाऱ्या या मालिकेचं लेखन केलंय मधुगंधा कुलकर्णी हिने तर मालिकेचे दिग्दर्शक आहेत चंद्रकांत गायकवाड. शर्मिष्ठा राऊत या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना भावेल यात शंकाच नाही.

शाळेत मास्तरीण आणि घरात कारभारीण, पाठ होईल का ह्याला संसाराचा पाढा नवी मालिका “तुला शिकवीन चांगलाच धडा” १३ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive