कोल्हापूरात बहरणार अर्जुन आणि रेवथी यांची प्रिती, पाहा Video

By  
on  

सोनी मराठी वाहिनीवरील 'जिवाची होतिया काहिली' ही मालिका आणि अर्जुन-रेवथीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता हीच लाडकी जोडी मालिकेत कोल्हापूर शहर फिरणार आहे. आणि त्याच वेळी अर्जुन रेवथीकडे प्रेमाची कबुली देणार आहे. रेवथी अप्पांना दिलेलं वचन मोडून अर्जुनला होकार देणार का, दोघांच्या घरी कळेल का, अशा अनेक गोष्टींनी मालिकेचे पुढील भाग रंगतदार असणार आहेत.

रेवथीचं भरतनाट्यम् स्पर्धेत सहभागी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जुन काहीही करायला तयार आहे. रेवथीने स्पर्धा जिंकावी यासाठी अर्जुने कोल्हापूरच्या अंबाबाईला नवस  केलेला असतो आणि आता तो नवस पूर्ण करण्यासाठी अर्जुन आणि रेवथी महालक्ष्मीच्या मंदिरात जाणार आहेत.

 

दर्शन झाल्यावर ते कोल्हापूरच्या पंचगंगा घाट , रंकाळा अशा अनेक ठिकाणी फिरणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या कोल्हापूर दर्शन  होणार आहे. याच वेळी अखेर अर्जुन रेवथीला त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे. आता रेवथी अर्जुनला होकार देणार का, अप्पांना दिलेलं वचन ती मोडणार का, अर्जुन-रेवथीचे कोल्हापूरला फिरणे घरच्यांना समजेल का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

पाहा, 'जिवाची होतिया काहिली', सोम.-शनि., संध्या. 7:30 वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Recommended

Loading...
Share