'रंग माझा वेगळा' मालिकेत येणार लीप; कथानक सरकरणार १४ वर्षांनी पुढे

By  
on  

 

स्टार प्रवाहच्या ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नात्यांचे बदलते रंग पाहायला मिळणार आहेत. मालिकेत लीप येणार असून कथानक १४ वर्षांनी पुढे सरकणार आहे. सध्या मालिकेत कार्तिकला साक्षीच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार ठरवत १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. संपूर्ण कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. न्यायालयाच्या निर्णयासमोर दीपाही हतबल झालीय. काही दिवसांपूर्वीच दोघांमधील गैरसमज दूर होऊन त्यांनी आपल्या नात्याची नवी सुरुवात केली होती. मात्र दीपा-कार्तिकचा आनंद नियतीला मान्य नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा दोघंही एकमेकांपासून दुरावलेत. दुराव्याच्या याच वळणावर मालिकेचं कथानकही १४ वर्षांनी पुढे सरकणार आहे.

या १४ वर्षात अनेक घडामोडी घडल्या आहेत. दीपिका-कार्तिकी मोठ्या झाल्या आहेत. १४ वर्षांची शिक्षा भोगून कार्तिकची सुटका होईल. मात्र आता दीपाचा वनवास सुरु होणार आहे. यामागे नेमकं काय कारण असेल? कार्तिकने दीपाला माफ केलं का? काय असेल या दोघांच्या नात्याचं भवितव्य? हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल. त्यासाठी पाहायला विसरु नका रंग माझा वेगळा सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वाजता फक्त स्टार प्रवाहवर. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Recommended

Loading...
Share