चाळीशी उलटलेल्या सौरभ-अनामिकाची लव्हस्टोरी घेणार प्रेक्षकांचा निरोप

By  
on  

झी मराठी वरील 'तू तेव्हा तशी' मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिकेतील सौरभ - अनामिका फेम स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी लोकप्रिय ठरली. चाळीशी उलटलेल्या कपलची गोष्ट प्रेक्षकांना चांगलीच भावली. या मालिकेच्या निमित्ताने ब-याच वर्षांनी सुप्रसिध्द अभिनेत्री शिल्पा तुळस्कर यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. परंतु, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘तू तेव्हा तशी’ मालिकेने नुकतेच ३०० भाग पूर्ण केले आहेत. अनेक कठीण परिस्थितीतून गेलेल्या अनामिका व सौरभची लव्ह स्टोरी या मालिकेतून पडद्यावर दाखवण्यात आली होती.  ‘तू तेव्हा तशी’ला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळालं.

स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकरसह या मालिकेत अभिज्ञा भावे, अभिषेक रहाळकर, स्वानंद बर्वे, उज्वला जोग,  सुहास जोशी, रुमानी खरे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ही मालिका दररोज रात्री 11 वाजता प्रसारित व्हायची. पण ता ह्याच वेळेसाठी नव्या मालिकेचे प्रोमो झळकू लागले आहेत. त्यामुळेच 'तू तेव्हा तशी'  ही मालिका आता निरोपाच्या उंबरठ्यावर आहे. 

Recommended

Loading...
Share