By  
on  

आई कुठे काय करते : नवरी सजतेय, पाहा Video

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. सध्या मालिकेचा टीआरपी यशोशिखरावर आहे, कारणही तसंच आहे. आई फेम अरुंधती देशमुखचं आशुतोष सोबत लग्न होणार आहे. त्यामुळे मालिकेत सध्या या लग्न सोहळ्याची धूम अनुभवता येतेय. आप्पांनी अरुंधतीचं लग्न समृध्दी बंगल्यावरच थाटामाटात करुन द्यायचं ठरवलं आहे. त्याप्रमाणे अरुंधतीची साग्रसंगीत मेहंदी-हळद पार पडतेय. अरुंधतीच्या पाठीशी असणार ेसर्वचजण या लग्नसोहळ्यात मनापासून सहभागी झाले आहेत आणि हा सोहळा अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करतायत.

स्टार प्रवाह वाहिनीनं नुकताच आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अरुंधती नवरीच्या वेशात दिसत आहे. नवरी सजतेय... असं म्हणत स्टार प्रवाह वाहिनं अरूंधतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अरुंधतीनं सुंदर  पैठणी नेसलेली दिसत आहे. शिवाय कपाळावरील मुंडवळ्या व हातातील हिरवा चुडा सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. चाहत्यांनी देखील तिच्या या लूकचं खुप अप्रूप आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

सध्या मालिकेत नवीन ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळत आहेत. पण अरुंधतीच्या लग्नासाठी अवघा प्रेक्षकवर्ग उत्सुक आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive