“ कुणाही एकट्या व्यक्तीला कोणत्याही वयात…” ‘आई कुठे काय करते’च्या अरुंधतीने ट्रोलर्सला सुनावलं

By  
on  

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. सध्या मालिकेचा टीआरपी यशोशिखरावर आहे, कारणही तसंच आहे. आई फेम अरुंधती देशमुखचं आशुतोष सोबत लग्न होणार आहे. त्यामुळे मालिकेत सध्या या लग्न सोहळ्याची धूम अनुभवता येतेय. आप्पांनी अरुंधतीचं लग्न समृध्दी बंगल्यावरच थाटामाटात करुन द्यायचं ठरवलं आहे. त्याप्रमाणे अरुंधतीची साग्रसंगीत मेहंदी-हळद पार पडतेय. अरुंधतीच्या पाठीशी असणार ेसर्वचजण या लग्नसोहळ्यात मनापासून सहभागी झाले आहेत आणि हा सोहळा अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करतायत.

पण अरुंधतीच्या दुस-या लग्नावरुन मालिकेतील कथानकातील काही पात्रं आणि काही प्रेक्षकवर्गही नाराज आहे. त्यांच्यात नाराजीचा सूर उमटलाय. या वयात कोण कसं लग्न करु शकतं, असा सवाल केला जातोय. नुकतंच अरुंधतीने इन्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच वाहिनीचे आभार मानले आहेत.

 

“अरुंधतीचं लग्न….

हे व्हावं की नाही… ? ह्या वयात लग्न करावं का…? केलं तर ते इतकं साजरं करावं का ? अशी विविध स्तरावर समाजात चर्चा झाली, होतेय. अनेकांना ह्यात आनंद होतोय तर काही जणांना मान्य होत नाहीये.
पण मला नक्की असं वाटतं की , कुणाही एकट्या व्यक्तीला कोणत्याही वयात आपल्याला आवडलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा अधिकार आहे. ते प्रौढ वयात होतंय, किंवा दुसरेपणाचं आहे म्हणून लपून छपून, साधेपणाने करावं असं का ? लग्न आहे ते… साजरं करावं.
हा इतका प्रागतिक विचार करणाऱ्या आमच्या वाहिनीचे स्टार प्रवाह चे आणि आमच्या प्रोजेक्ट हेड नमिता नाडकर्णीचे आणि दिग्दर्शक रवींद्र करमरकर ह्यांचे खरोखर धाडस आहे आणि अतिशय कौतुकास्पद आहे.”, अशी पोस्ट मधुराणी प्रभूलकरने केली आहे.

 

Recommended

Loading...
Share