'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही छोट्या पडद्यावरची गूढ रहस्यमय मालिका अल्पावधितच प्रेक्षकांची लाडकी बनलीय. प्रत्येक एपिसोड गणिक यातील कथानकाची उत्सुकता ताणून धरतेय. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान असल्याने तिला भविष्यात घडणा-या घटनांचे-संकटांचे संकेत मिळतात. त्यामुळेच ती अद्वैतचा जीव वाचवू शकते. तसंच राजाध्याक्षांच्या घराचं ती सुरक्षा कवच बनलीय. या घरात असलेल्या व संपूर्ण घरावर हक्क गाजवणा-या रुपाली म्हात्रे नावाच्या वादळापासून वाचविण्यासाठी तिचे शर्थिचे प्रयत्न सुरु आहेत.
रुपाली कट कारस्थानं रचण्यात बिल्कुल मागे-पुढे पाहत नाहीय. शेखर राजाध्यक्ष, तेजस, केतकी काकू आणि आज्जी या सर्वांसमोर रुपालीचा खरा चेहरा आला असला तरी ती उजळ माथ्याने घरात फिरतेय. यासाठी तिने अद्वैतला आपलं प्यादं बनवलंय. रुपालीने इतकी वर्ष सर्वांना फसवलंय यावर विश्वास ठेवायला अद्वैत तयारच ना नेत्राचा काटा काढण्यासाठी आता रुपालीने बंटीच्या साह्याने इंद्राणी या नेत्रासारख्याच दिव्य शक्ती असलेल्या स्त्रीशी हातमिळवणी केलीय. ती सुध्दा त्रिनयना देवीची भक्त आहे. आता इंद्राणी राजध्यक्षांकडे पोहचलीय. तिची आणि नेत्राची समोरासमोर भेट होणार तेव्हा नेमकं काय घडणार, इंद्राणी ठरल्याप्रमाणे घरात राहायला येणार आणि रुपालीच्या कटात सामील होणार? दोघी मिळून नेत्राचा काटा काढणार? कीउलट इंद्राणी नेत्राच्या बाजूने इभी राहणार आणि राजाध्यक्षांच्या घराला रुपाली पासून वाचवणार ह्या सर्वांची उत्तर 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' च्या आगामी भागांमध्ये कळेल.
साधी भोळी पण सदैव दक्ष असलेल्या नेत्राच्या भूमिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि रुपाली ही खलनायिका गाजवतेय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या सोबतच आता इंद्राणी या गूढ व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहे अभिनेत्री श्वेता मेहंदळे.
तेव्हा सातव्या मुलीची सातवी मुलगी झी मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री 10.30वाजता पाहा.