By  
on  

पाहा अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिदीर्तील लक्षणीय ठरलेली घटना म्हणजे औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून आग्र्याहून केलेली सुटका. अमोल कोल्हेंच्या शिवप्रताप गरुडझेप सिनेमातून ही ऐतिहासिक घटना पुन्हा एकदा जिवंत करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाच्या आग्रा भेटीचा थरार येत्या ९ एप्रिलला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चर वाहिनीवरुन अनुभवायला मिळणार आहे. वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाटेला जात नाहीत, पण जर कोणी डिवचलं तर फाडल्याशिवाय रहात नाहीत. सिनेमातला हा संवाद अंगावर रोमांचं आणल्याशिवाय रहात नाही. उर अभिमानाने भरुन येईल असे अनेक संवाद या सिनेमाचं बलस्थान आहे.
 

स्टार प्रवाहच्या राजा शिवछत्रपती या मालिकेतून डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घराघरात पोहोचले. अमोल कोल्हेंना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून रुपेरी पडद्यावर पहाणं हा सोहळा आहे. सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे सिनेमाचं शूटिंग लाल किल्यामध्ये पार पडलं आहे. या वास्तूची भव्यता सिनेमा पहाताना प्रेक्षकांना नक्कीच थक्क करेल.

 

 

 

महाराष्ट्रापासून दूर उत्तरेत आणि तेही औरंगजेबाच्या अमलाखालील प्रदेशात जाऊन सहीसलामत परत येणं ही अशक्यप्राय वाटणारी कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी फत्ते केली हे शिवप्रताप गरुडझेप चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आग्रा मोहिमेचा हा रोमांचकारी इतिहास पाहायला विसरु नका ९ एप्रिलला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चरवर.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive