गोठ, आनंदी हे जग सारे आणि श्रीमंताघरची सून यांसारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवणारी अभिनेत्री रुपल नंद काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात. आता रुपल पुन्हा एकदा आपल्या कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. न नेहमी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री रूपल नंद आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या नव्या मालिकेतून रूपल नंद प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात रूपलची नवी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी निरनिराळ्या मालिकांमधून विशेष व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रूपल नेहमीच मग्न असते. आता ती एका नव्या रूपात नव्या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना आपल्याला दिसणार आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे.
पोलीस आपल्या कामात नेहमी तत्पर असतात. दिवस-रात्र आपल्या कामाला महत्त्व देतात. आपल्या कुटुंबासाठी द्यायला पुरेसा वेळ त्यांच्याकडे नसतो. आपल्या कामाला नेहमी प्राधान्य देतात. अशाच प्रकारची विशिष्ट व्यक्तिरेखा या मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटणार आहे, ती म्हणजे इन्स्पेक्टर भोसले. आपल्या कामात नेहमी तत्पर असणारे इन्स्पेक्टर विजय भोसले यांच्या आयुष्यातील दुसरी बाजू, ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’! मालिकेतून उलगडणार आहे.
याव्यतिरिक्त अश्विनी कासारही या मालिकेतून पोलीस निरीक्षकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १ मेपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता ही मालिका सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबद्दल फार कुतूहल आहे.
पाहायला विसरू नका नवी मालिका ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’, १ मेपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.