उरात हुरहुर सुरात सनई
मुहूर्त येई लग्नाचा...
आज आपुल्या दोन मनांचा
सौभाग्ये साजरा...
बघ विवाह हा, बघ विवाह हा
शुभविवाह हा झाला....
सायकल राणी म्हणता म्हणता भूमी आता आकाशची पत्नी होतेय. खरतर दोघांचा हा विवाहसोहळा विलक्षण आहे. बहिणीच्या सुखासाठी भूमीने आपला आनंद बाजूला सारत मानसिक स्थैर्य गमावलेल्या आकाशसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. मनात हुरहुर असली तरी आकाशला पावलापावलावर साथ देण्याचं वचन भूमीने दिलं आहे. म्हणूनच तर आकाश आणि भूमीचा हा शुभविवाह खास आहे. दोघांच्या आयुष्याची नवी सुरुवात होत असली तरी हा प्रवास वाटतो तितका सुखकर नक्कीच नाही. मेहंदी समारंभातही आकाशची फजिती होताना पाहून भूमीने पुढाकार घेत त्याचा मान राखला.
हळदीच्या दिवशीही काहीसा असाच प्रसंग घडला. मात्र देवीच्या साक्षीने दोघांनाही हळद लागलीच. लग्नाच्या दिवशीही आगीची भीती वाटत असल्यामुळे आकाश सात फेरे घेण्यास नकार देणार आहे. मात्र लहान मुलाप्रमाणे आकाशची समजून काढून भूमी त्याला फेरे घेण्यासाठी तयार करणार आहे. अनेक आव्हानांचा सामना करत भूमी-आकाशला एकमेकांची साथ द्यायची आहे. आकाशला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी भूमी अखंड प्रयत्न करणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका भूमी-आकाशचा शुभविवाह सोमवार ते शनिवार दुपारी २.०० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.